Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार

सांगोला : दि.२९ (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ विधिज्ञ ज्यांनी ५८ वर्षे वकिलीचा व्यवसाय केला आणि ज्यांनी सांगोला तालुका ,पंढरपूर तालुका, मंगळवेढा तालुका, येथील अनेक किचकट दिवाणी प्रकरणे आणि फौजदारी प्रकरणे  यशस्वीरीत्या चालवली, असे सोलापूर जिल्ह्यातील आदरणीय व्यक्तिमत्व ॲड. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. 

पृथ्वीराज चव्हाण हे केवळ निष्णात वकील आहेत तसेच ते ज्ञानेश्वरीचे व संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचे वकृत्व अचंबित करणारे आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या संग्रही सुमारे तीन हजार ग्रंथ आहेत त्यांनी विविध लॉ जर्णल अभ्यासपूर्ण लेख लिहिलेले आहेत त्यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

 त्याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ज्येष्ठ ॲड. धनंजय माने , ॲड. उदय घोंगडे , ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. आनंदराव कुर्डूकर , ॲड. सिद्धेश्वर खंडागळे , ॲड. गजानन भाकरे , ॲड. हर्षवर्धन विजयसिंह चव्हाण , ॲड. सचिन सरगर , ॲड. शिवकुमार ढोले हे हजर होते.

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے