"एखादा वृत्तांत चुकीच्या पद्धतीने सादर करणे धर्म आणि नैतिकता दोन्हींच्या दृष्टीने मोठा गुन्हा आहे : टिपू सुलतान
जमातवादाचा बळी ठरलेले लोकोत्तर इतिहासपुरुष - भारतीय समाजमनाला नेहमीच इतिहासपुरुषांच्या अलौकिक कर्तृत्वाचे आकर्षण वाटत आले आहे. त्यांच्या इतिहासाची सातत्याने चर्चा होत राहिली आहे. भारतीय समाजोद्धाराच्या अनेक चळवळी इतिहासपुरुषांच्या प्रेरक कार्यातून उभ्या राहिल्या आहेत. या इतिहासपुरुषांचा इतिहास वेगवेगळ्या विचारधारांतून रेखाटण्यात आला आहे.
वेगवेगळ्या समाजवर्गातील महापुरुषांनी घडविलेला इतिहास आधुनिक काळात वेगवेगळ्या दृष्टीने मांडण्यात आला आहे. त्यातून भारतीय समाजात अनेक स्थित्यंतरे घडली आहेत. या स्थित्यंतरातून भारतीय समाजमन समृद्ध झाले आहे. त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. भारतीय समाज प्रगतीकडे झेपावत आहे. असे असले तरी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या इतिहासाविषयी भारतीय समाजात प्रचंड चुकीच्या समजुती रुढ आहेत. जमातवादी इतिहास लेखकांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
जमातवादी इतिहास लेखकांमुळे भारतीय समाजाला मुसलमान राज्यकर्त्यांच्या मूळ इतिहासाचे सत्य स्वरूप समजू शकले नाही. त्यामुळेच मुस्लिमांच्या अनेक अलौकिक इतिहासपुरुषांविषयी भारतीय समाजातून नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होतात. समाजाचे नायक म्हणून ज्यांची ओळख व्हावी ते इतिहासपुरुष आज खलनायक म्हणून हिणवले जात आहेत. समाजाच्या सुखाची स्वप्ने पाहिलेले हे लोकनायक तिरस्काराचा विषय ठरले आहेत. अशा तिरस्काराचा बळी ठरलेले दोन लोकोत्तर इतिहासपुरुष म्हणजे नवाब फतेहबहादूर हैदरअली खान आणि फतेहअली टिपू सुलतान.
म्हैसूरच्या इतिहासाचे जमातवादी लेखन आधुनिक काळात म्हैसूरचा इतिहास लिहिण्याची सुरुवातच मुळात त्यांच्या शत्रुकडून म्हणजे इंग्रजांकडून करण्यात आली. शत्रू पक्षातील इतिहासकार शशबूकडून तस्पर्धी राज्यकर्त्यांचा इतिहास प्रामाणिकपणे मांडत नाहीत. हे इतिहासकार स्वपक्षापेक्षा कधीही प्रतिस्पर्ध्याला कमअस्सल ठरवतात. जेत्यापेक्षा जितांचे कालखंड लोकहित निष्ठूर असल्याचे प्रकर्षाने मांडतात. टिपूंचा इतिहास लिहिणाऱ्या इंग्रज इतिहासकारांना वसाहतवादी धोरणाचा प्रचार करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी वसाहतवादाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या प्रत्येक भारतीय राज्यकत्र्याला बदनाम केले. भारतीय समाजात द्वेषपेरणी करण्यासाठी त्यांना जातीयवादी ठरवले. त्यातून भारतीय समाजात द्वेषाची भिंत उभारून वसाहतवादी इतिहासकारांनी इंग्रजी सत्ता बळकट केली, अल्पसंख्य असणाऱ्या इंग्रजांनी अशा पद्धतीने फूट पाडून बहुसंख्याक भारतीयांवर राज्य केले. हिच पद्धत आजच्या जमातवाद्यांनी स्वीकारली आहे. अल्पसंख्य धर्ममुखंडांच्या हाती सत्तेची सर्व सूत्रे राहावीत,यासाठी त्यांनी इतिहासाचे जमातवादीकरण केले आहे. त्यातून मुसलमान राज्यकर्त्यांचा इतिहास विपर्यस्तरीतीने मांडला जात आहे.
टिपू व हैदरअलीविषयीचे गैरसमज याच जमातवादी इतिहासकारांनी दृढ केले आहेत. त्यासाठी त्यांनी वसाहतवादी इंग्रज इतिहासकारांच्या ग्रंथांतील संदर्भ मोठ्या खुबीने वापरले आहेत. टिपूंच्या बदनामीसाठी जमातवादयांनी एक मोहीमच राबविली आहे. टिपूंची बदनामी करणाऱ्या इतिहासकारांच्या मांडणीत मोठे साम्य व लेखनात सातत्य आहे. ग.ह.खरे यांनी लिहिलेले 'श्रीरंगपट्टणमची स्वारी', आपटे यांचे 'श्रीरंगपट्टणमची मोहीम', सावरकर यांचे 'सहा सोनेरी पान' अथवा गो.स.सरदेसाई यांची 'रियासत' हे सर्व लेखन जमातवादाकडे झुकणारे आहे. अलीकडच्या काही वर्षांत त्यात सेतुमाधव पगडी,ब.ना.जोग आणि संघपुरस्कृत काही प्रचारकी इतिहासकारांचीही भर पडली आहे. या सर्वांनी टिपूंच्या इतिहासावर काही आक्षेप लावताना बऱ्याच मुद्यांचा प्रेक्षपही केला आहे.
जमातवादी इतिहासकारांनी टिपूंविषयी केलेली विधाने खूपच गंभीर आहेत. विल्क्ससारख्या वसाहतवादी इतिहासकारानेही तशी विधाने केली नाहीत. टिपूंच्या इतिहासाची सत्यता कळावी यासाठी त्यातील काहींच्या मतांची आपण चिकित्सा करुयात.
इतिनाशकाच्या भूमिकेत सावरकर - विसाव्या शतकात ऐतद्देशीय इतिहासकारांत रियासतकार सरदेसाई यांनी सर्वप्रथम टिपूंविषयी आकसाने इतिहास लेखन केले. तद्नंतर सावरकरांनी सहा सोनेरी पाने' या ग्रंथांतून टिपूंचा इतिहास विकृत केला, जमातवादी इतिहासकार सरदेसाईपेक्षा सावरकरांचे टिपूंविषयीचे लिखाण प्रमाण मानतात. ते त्यांच्या सोयीचेही आहे. कारण सरदेसाई काही ठिकाणी म्हैसुरच्या इतिहासविषयी चुकीची माहीती देत असले तरी टिपू व हैदरअलींचे वसाहतवादाविरोधातील संघर्षाचे महत्त्वही ते अधोरेखित करतात. पेशव्यांच्या गुणदोषांचीही चर्चा करतात,त्या तुलनेत सावरकर इतिहासलेखनात धर्ममुखंडांच्या सोयीची भूमिका मांडतात. त्यामुळे सरदेसाई यांचे टिपूंविषयीचे विचार पाहण्याआधी आपण सावरकरांनी टिपूंविषयी मांडलेल्या मतांची चिकित्सा करूयात.
सावरकरांचे इतिहासलेखन सरदेसाईंच्या तुलनेत सदोष असे आहे. सरदेसाई इतिहास लिहताना इतिहास लेखन शास्त्राचा वापर करतात, तर सावरकर धर्मशास्त्रांना इतिहास लेखनाचा आधार मानतात. हैदरअली व टिपूंच्या इतिहासातील घटनांची धार्मिक, पुराणकथांशी तुलना करतात, सावरकरांनी टिपूंचा इतिहास लिहिताना अनेक ठिकाणी तर्कशास्त्राचा ही चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे,अनेक प्रसंगांचा प्रक्षेप केला आहे, स्वरचित घटना हैदरअली व टिपूंचा इतिहास म्हणून समोर आणल्या आहेत. या लोकोत्तर पिता-पुत्रांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. टिपू सुलतान यांच्या बदनामीची कपोलकल्पित कथा साहित्यिक कौशल्याने,भाषेवरील प्रभुत्त्वाने आणि इंग्रजी इतिहासकारांच्या मदतीने सावरकरांनी चांगलीच रंगवली आहे. टिपू सुलतान लोकांच्या तिरस्काराचा विषय ठरावा यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले आहेत. सावरकर हे टिपूंचा इतिहास पुराव्यांऐवजी जमातवादी विचारांच्या आधारे मांडतात. टिपूच नव्हे तर सर्वच बहुजन इतिहासपुरुषांविषयी सावरकरांनी इतिहास लेखनात अशीच संकुचित भूमिका घेतली आहे. सावरकर ब्राह्मणेतर इतिहासपुरुषांचा इतिहास लिहिताना संकोचतात. हे त्यांच्या इतिहास लेखनातून स्पष्टपणे जाणवते. त्यामुळेच अनेक विचारवंतांनी त्यांना इतिहासकार मानण्यास नकार दिला आहे.
सावरकरांचे इतिहास लेखन - सावरकरांनी अनेक पुस्तकांचे लिखाण केले आहे. त्यातील बहुतांश पुस्तकांची रचना इतिहासावर आधारित आहे. इतिहास हा सावरकरांच्या अस्मितेचा विषय होता. त्यामुळेही कदाचित ते इतिहास लेखनाकडे वळले असतील. त्यांच्या इतिहास लेखनाविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत. इतिहास लेखनाच्या त्यांच्या पद्धती विषयीसुद्धा काहींना आक्षेप आहेत. सावरकरांनी इतिहास लेखनाविषयों स्वीकारलेल्या समग्र भूमिकेची चिकित्सा करणे इथे अशक्य आहे. त्यामुळे फक्त म्हैसूरच्या इतिहासाविषयीच्या त्यांच्च्या काही मतांचीच इथे चर्चा करूयात. सावरकरांनी स्वातंत्र्यानंतर साधारणत: १९६३ साली 'सहा सोनेरी पाने' है पुस्तक लिहिले आहे. स्वतःस मान्य असणाऱ्या भारतीय इतिहासातील सुवर्णयुगाविषयी सावरकरांनी यातून लिखाण केले आहे, त्यांनी परिच्छेद क्रमांकानुसार या पुस्तकाची रचना केली आहे. त्यामुळे रचनेच्या बाबतीत या पुस्तकाचे वेगळेपण जाणवणारे आहे. चंद्रगुप्त चाणक्य,यवनान्तक सम्राट पुष्यमित्र, 'सहा सोनेरी शककुशाणांतक विक्रमादित्य,हुणांतक यशोधर्मा,महाराष्ट्रीय पराक्रमाचा उच्चांक आणि इंग्रज गेले,हिंदुराष्ट्र स्वतंत्र झाले ही सावरकरांच्या मते भारतीय इतिहासातील पाने' आहेत. आणि प्रख्यात इतिहास संशोधक मदन पाटील आक्षेप नोंदविताना म्हणतात, 'सहा सोनेरी पाने' लिहित असताना त्यांच्याकडे भरपूर संदर्भ असावेत किंवा ते त्यांना मिळविता आले असते. त्यांचा वापर करून वस्तुनिष्ठ इतिहासाचे दर्शन वाचकांसमोर ठेवणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी तसे करणे टाळले आणि एक धादांत असत्य इतिहास वाचकांसमोर ठेवला. थोडक्यात ज्यांनी इतिहास घडविला,त्यांचा सोनेरी पानांची सावरकरांनी केलेली निवडदेखील वादाला निमंत्रण देणारी ठरली. त्याअनुषंगाने त्यांच्यावर प्रचंड टीकादेखील झाली. त्यांचे इतिहास लेखन चुकीच्या गृहितकांवर आधारित असल्याचा आरोप करण्यात आला. सावरकरांचे टीकाकार सावरकरांच्या इतिहास लेखनावर इतिहास,इतिहास घडवण्याची क्षमता नसलेल्यांनी लिहिल्यावर तो कसा लिहिला जातो याचा वस्तुपाठ सावरकरांनी गिरवला. सावरकरांवर मदन पाटलांनी केलेली टीका जहाल अशी आहे. पण त्यात व्यक्त केलेली मते नाकारता येण्यासारखी नाहीत. सावरकरांनी 'सहा सोनेरी पादेने या पुस्तकात लिहिलेला इतिहास चुकीच्या गृहितकावर आधारित आहे. हे मदन पाटील यांचे विचार वास्तवदशी आहेत. टिपू सुलतान यांच्या इतिहासाचे सावरकरांनी केलेले लेखन त्याचेच निदर्शक आहे.

0 تبصرے