Ticker

6/recent/ticker-posts

शूरविर टीपू सुलतानवाघांचा वाघ होताजुल्माला जाळणारीधगधगती आग होता...!


॥वाघाचा वाघ....॥

शूरविर टीपू सुलतान
वाघांचा वाघ होता
जुल्माला जाळणारी
धगधगती आग होता...!

सलाम घाली शौर्य ज्याला
लढताना रणमैदानी
लखलखती तलवार ज्याची
वै-यास पाजे पाणी

भल्याभल्यांना ज्याचा
सदैव धाक होता.......
शूरविर टीपू सुलतान
वाघाचा वाघ होता.....

शेवटश्वास ही ज्याचा
मायभूशी इमान राखी
लढताना मायभूसाठी
हसता हसता प्राण त्यागी

तो लाल या भूमातेचा
अद्वितिय त्याग होता......
शुरविर टीपू सुलतान
वाघांचा वाघ होता......

रक्ताचा प्रत्येक थेंब ज्याचा
करी अभिषेक इथल्या मातीचा
शहीद टीपू देशभक्तीच्या
दीप जळत्या वातीचा

दीपस्तंभ आदर्शाचा
देशाभिमानाची जाग होता.....
शूरविर टीपू सुलतान
वाघांचा वाघ होता.........

रक्षणार्थ मायभूच्या
छातीची ढाल केली
रणशूर महायोध्दा
मर्दानी वार झेली

इतिहासाची कूस बदले
असा ज्याचा प्रताप होता......
शूरविर टीपू सुलतान 
वाघांचा वाघ होता....

🇮🇳 🙏 🇮🇳
          ✍🏻 
शेख बिस्मिल्ला सोनोशी
9881667198

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے